मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
खुश खबर खुश खबर एप्रिल महिन्यातिल लाडक्या बहिणीचा हफ्ता लवकर बँक खात्यात जमा होनार..

- महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना‘
- सध्या चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र, निवडणुकीदरम्यान या रकमेची वाढ ₹२,१०० पर्यंत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तथापि, मार्च २०२५ मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही वाढ जाहीर करण्यात आली नाही, ज्यामुळे अनेक लाभार्थी निराश झाले आहेत.
- अर्थसंकल्पात या योजनेसाठी निधीची कपात करण्यात आली आहे, ज्यामुळे भविष्यातील हप्त्यांवर परिणाम होऊ शकतो. राज्य सरकारच्या वाढत्या कर्जामुळे ही कपात आवश्यक ठरल्याचे सांगितले जात आहे.
- फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे ७ मार्च २०२५ रोजी २.५२ कोटी महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हे वितरण करण्यात आले.
- लाभार्थी महिलांनी त्यांच्या बँक खात्यांची स्थिती तपासावी आणि अधिक माहितीसाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. योजनेतील बदल आणि अद्यतनांसाठी अधिकृत सरकारी घोषणांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
Latest Updates लाडकी बहिण योजना २०२५
महाराष्ट्र राज्याच्या 2024 चा अर्थसंकल्पात सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात) ही योजना आणण्यात आली आहे, या योजनेनुसार महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या सरकारच्या ध्येय आहे. या योजनेमुळे महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणार आहे.
त्यासाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेसाठी पात्र असणार आहे, यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना काय आहे, या योजनेच्या लाभ घेण्यासाठी कोण अर्ज करू शकतो, आणि त्याच्यासाठी प्रक्रिया काय आहे आणि कोणते डॉक्युमेंट, हमीपत्र या योजनेसाठी आपल्याला लागेल याची सविस्तर माहिती सरकारने योजने संदर्भातील शासन निर्णय जाहीर केले आहे त्यात योजने बद्दलची उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ | ladki bahin yojna
आणखी वाचा
- जर आपण अद्याप अर्ज केला नसेल, तर सरकार लवकरच तिसरा टप्पा सुरू करणार आहे. अर्ज करण्यासाठी
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://mahilakalyan.maharashtra.gov.in
- “लाडकी बहीण योजना अर्ज” पर्याय निवडा.
- व्यक्तिगत माहिती भरा (आधार क्रमांक, बँक खाते तपशील इ.).
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज सबमिट करा आणि अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासा.जवळच्या ग्रामपंचायत/नगरपरिषद कार्यालयात जा.
- ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करा: www.ladkibahinyojna.in
- गावानुसार यादि पाहण्यासाथी दिलेल्या लिंक वर क्लिक करा. https://ladkibahiniyojana.com
- https://ladkibahiniyojana.com/https://ladkibahiniyojana.com/
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे लिस्ट
- मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
- लाभार्थी महिलेचे आधार कार्ड.
- लाभार्थी महिलांच्या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्माच्या दाखला, राशन कार्ड, मतदान कार्ड .
- सक्षम अधिकाऱ्याकडून दिलेल्या कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, राशन कार्ड.
- बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी.
- फोटो KYC करीता.
- राशन कार्ड .
- लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्थीचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला असतील अपात्र
- ज्या महिलांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असतील.
- ज्या महिला कुटुंबातील सदस्य आयकर भरतात.
- कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतरचे वेतन घेत आहेत.
- लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजना द्वारे लाभ घेतला असेल.
ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार- खासदार आहे. - ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे.
- ज्याच्याकडे चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) आहे
योजेनेत झालेले बद्दल
१. हप्त्याच्या रकमेतील बदल
- या योजनेअंतर्गत इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना दरमहा ₹१५०० सन्मान निधी दिला जातो.
- ज्या महिलांना ‘नमो शेतकरी योजना’ किंवा इतर योजनांद्वारे आधीच ₹१००० मिळत आहेत, त्यांना लाडकी बहीण योजनेतून फक्त ₹५०० मिळणार आहेत
२. २१०० रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा
निवडणुकीपूर्वी सरकारने महिलांना दरमहा ₹२१०० देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. त्यामुळे हा वाढीव हप्ता अद्याप लागू करण्यात आलेला नाही
३. योजना बंद होणार नाही
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे की, लाडकी बहीण योजना सुरूच राहील आणि ती बंद करण्याचा कोणताही विचार नाही.
४. एप्रिल महिन्याचा हप्ता
मार्च महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीया म्हणजेच ३० एप्रिल रोजी जमा होण्याची शक्यता आहे, परंतु याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही.
अधिक माहितीसाठी किंवा तुमच्या पात्रतेबाबत शंका असल्यास, स्थानिक प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधा किंवा अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://ladakibahin.mahttps://ladakibahin.maharashtra.gov.in/