प्रधानमंत्री आवास योजना-प्रत्येकासाठी घर मिळणार.
नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमच आपल्या या नवीन ब्लोगमध्ये .आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री आवास योजना 2025 बद्द्दल माहिती.प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण ही केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब, बेघर किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना 2022 पर्यंत पक्के व सुरक्षित घर उपलब्ध करून देणे होय.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणभाग मिळणार अडीच लाख रुपये ?

2025 पर्यंतचे महत्त्वाचे अपडेट्स
केंद्र सरकारने ‘सर्वांसाठी घर’ या मिशनची अंतिम मुदत डिसेंबर 2024 वरून मार्च 2029 पर्यंत वाढवली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अधिक कुटुंबांना पक्के घर मिळण्याची संधी उपलब्ध होईल.सरकारने PMAY-G अंतर्गत 3 कोटी नवीन पक्की घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यामुळे सुमारे 10 कोटी लोकांना लाभ होईल.
रक्कम वाढीबाबत शिफारसी व मागण्या
संसदीय समितीने PMAY-G अंतर्गत मदत रक्कम वाढवण्याची शिफारस केली आहे.काही राज्य सरकारांनी केंद्राकडे रक्कम ₹2 लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. घरांचे वाढलेले दर, मजुरी आणि बांधकाम साहित्य महाग झाल्यामुळे सध्याची रक्कम अपुरी पडते, अशी शासकीय निरीक्षणे आहेत.यावर लवकरच सरकारची घोषणा होईल.रक्कम वाढीवर लवकरच पुढील माहिती येयील .
काय आहे प्रधानमंत्री आवास योजना ? PMAY-G अंतर्गत रक्कम वाढीबाबत अद्ययावत माहिती .
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी 2015 साली सुरू करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे 2025 पर्यंत प्रत्येक गरजू कुटुंबाला पक्कं घर उपलब्ध करून देणे आहे .
2.69 कोटी पक्क्या घरांचे बांधकाम पूर्ण
मार्च 2025 पर्यंत, PMAY-G अंतर्गत देशभरात 2.69 कोटी पक्क्या घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सरकारने 31 मार्च 2024 पर्यंत 2.95 कोटी घरांचे लक्ष्य ठेवले होते. यासाठी केंद्र सरकारने राज्यांना 2.26 लाख कोटी रुपयांचे वित्तीय सहाय्य दिले आहे.
योजनेचे प्रकार:-
- PMAY – ग्रामीण (Gramin) : ग्रामीण भागातील लोकांसाठी.
- 2.PMAY – शहरी (Urban): शहरी भागातील गरजूंसाठी
योजनेचे वैशिष्ट्ये :-
- आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी घरबांधणीसाठी आर्थिक मदत.
- महिलांना घराच्या मालकीमध्ये प्राधान्य.
- दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांना घराच्या जागेच्या निवडीत प्राधान्य.
- 6.5% पर्यंत व्याज सवलत मीण भागातील गरीब, बेघर, किंवा कच्च्या घरात राहणाऱ्यांना पक्कं घर देणे.
- घरात स्वच्छ शौचालय, स्वच्छ इंधन (गॅस), बिजली, आणि पेयजल सुविधा देणे
अर्ज कसा करावा ?
- ऑनलाइन अर्ज: https://pmaymis.gov.in
- ऑफलाइन अर्ज: जवळच्या महापालिका/पंचायतीमध्ये/ग्रामपंचायत मध्ये संपर्क करा.
- आवश्यक कागदपत्रं: आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, मालमत्ता माहिती इ.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणभाग मिळणार 2.5 लाख रुपये ? |प्रधानमंत्री आवास योजना 2025 |pradhanmantri aawas gramin yojna.
पात्रता :-
- SECC 2011 (सामाजिक, आर्थिक आणि जातीय जनगणना) यादीतील लाभार्थी.
- बेघर किंवा फक्त एक खोल्याचं कच्चं घर असणारे.
- अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक वर्ग, महिला-प्रमुख कुटुंब.
- उत्पन्नाच्या आधारावर निवड केली जाते (पारंपरिक अर्ज प्रक्रिया नाही).
प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण रक्कम वाढ झाली ?
प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत घर बांधणीसाठी मिळणाऱ्या आर्थिक मदतीत सध्या कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. सध्या, सपाट भागांसाठी ₹1.20 लाख आणि डोंगराळ/विशेष भागांसाठी ₹1.30 लाख इतकीच मदत दिली जाते.
तथापि, काही राज्यांनी या मदतीत ₹1 लाखांची वाढ करण्याची मागणी केली आहे. तसेच, संसदीय समितीने देखील या मदतीत वाढ करण्याची शिफारस केली आहे.
परंतु, केंद्र सरकारने अद्याप या मागण्यांवर कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे, आर्थिक मदतीत वाढ होण्याबाबतची अधिकृत घोषणा झाल्यास, ती सार्वजनिकरित्या जाहीर केली जाईल.
PMAY-G अंतर्गत रक्कम वाढीबाबत अद्ययावत माहिती (मार्च 2025 पर्यंत)
सध्याची मदत रक्कम:
भाग | रक्कम |
सपाट भाग | ₹1.20 लाख |
डोंगराळ / अविकसित भाग | ₹1.30 लाख |
शौचालयासाठी (SBM अंतर्गत) | ₹12,000 |
मजुरी (MGNREGA) | 90–95 दिवसांची मजुरी |
रक्कम वाढीबाबत शिफारसी व मागण्या:
- संसदीय समितीने PMAY-G अंतर्गत मदत रक्कम वाढवण्याची शिफारस केली आहे.
- काही राज्य सरकारांनी केंद्राकडे रक्कम ₹2 लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे.
- घरांचे वाढलेले दर, मजुरी आणि बांधकाम साहित्य महाग झाल्यामुळे सध्याची रक्कम अपुरी पडते, अशी शासकीय निरीक्षणे आहेत.
निष्कर्ष:
PMAY-G अंतर्गत मिळणारी आर्थिक मदत सध्या ₹1.20–1.30 लाख इतकीच आहे.
रक्कम वाढीबाबत प्रस्ताव आणि शिफारसी झाल्या असल्या तरी अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

लवकरच पुढील updates तुमच्या या हक्काच्या पेजवर येईल.
- FOR LIST click on this link https://pmawasgraminlist.com
- ऑनलाइन अर्ज: https://pmaymis.gov.in visit our website https://hkkadam.com
- visit our website https://hkkadam.com